Suryakumar Yadav Video : सूर्याची कमाल, तो शॉट पाहून विराटही झाला हँग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav  virat kohli

Video : सूर्याची कमाल, तो शॉट पाहून विराटही झाला हँग

Suryakumar Yadav Video : टीम इंडियाने आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या सामन्यातही पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभव केला होता.

हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात जिथे कोहली आणि राहुल बॉल टू रन करत होते, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. इतकेच नाही तर भारतीय डावाच्या शेवटच्या षटकातही सूर्यकुमारने सलग 3 चेंडूत 3 षटकार ठोकत चाहत्यांची मने जिंकली. 16 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मधल्या स्टंप लाईनवर बसून स्वीप शॉट मारणे, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याचवेळी हा खास शॉट पाहून किंग कोहली हँग झाला. भारताचा डाव संपला तेव्हाही कोहलीने सूर्यकुमार यादवला वाकून नमस्कार केला, ज्याचे खूप कौतुक केले जात आहे.

हेही वाचा: Video : सूर्यकुमारचा षटकारांचा षटकार! विराटनेही केला सलाम

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हाँगकाँगविरुद्ध भारताचा पहिला डाव संपल्यानंतर कोहलीने सूर्यकुमार यादवसमोर नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादवने अशी खेळी खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. आंतरराष्ट्रीय आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने अनेकदा हे केले आहे.

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला होता. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार आणि तब्बल चौकार मारले. यातील चार षटकार सूर्यकुमारने डावाच्या शेवटच्या षटकात मारले. स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर्याला चांगली साथ दिली. कोहली आणि सूर्या यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची नाबाद भागीदारी केली.

हेही वाचा: Asia Cup IND vs HK : सूर्या तळपला! हाँगकाँगला मात देत भारत सुपर 4 मध्ये दाखल

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 2 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करू शकला.

Web Title: Asia Cup 2022 Suryakumar Yadav Sensational Six Hitting Spree Vs Hong Kong Virat Kohli React Video Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..