Asia Cup 2023 : "तुमची लायकी तरी..." पहिल्याच सामन्यात पाकिस्तान झाला ट्रोल, चाहते संतापले

asia cup 2023 fans troll pakistan
asia cup 2023 fans troll pakistan

Asia Cup 2023 PAK vs NEP : सहा देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आशिया कपला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात आयोजित करण्यात आला होता.

15 वर्षांनंतर कोणत्याही मोठ्या टूर्नामेंट मॅचचे पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात आली होते, त्यामुळे पीसीबीला आशा होती की चाहते सामना पाहण्यासाठी येतील. पण असे झाले नाही. मुलतानमधील स्टेडियममध्ये सुरुवातीपासूनच लोकांची संख्या खूपच कमी असल्याने संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्याची मागणी करणार्‍या पाकिस्तानला चांगलीच लाज वाटली.

asia cup 2023 fans troll pakistan
Asia Cup 2023 : आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत! नेपाळविरुद्धच्या सामन्यात अचानक गेला मैदानाबाहेर

आशिया कप सारखी स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे, परंतु मुलतानमधील दृश्ये खरंच चांगले नव्हते. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानचा 3-0 ने पराभव करून ICC वनडे संघ क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे, परंतु सलामीच्या सामन्याला पाकिस्तानी चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला नाही. विशेष म्हणजे, आयोजकांना 30,000 क्षमतेच्या खचाखच भरलेल्या स्टेडियमची अपेक्षा होती.

asia cup 2023 fans troll pakistan
Asia Cup 2023 : आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत! नेपाळविरुद्धच्या सामन्यात अचानक गेला मैदानाबाहेर

पीसीबीने चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय गायिका आयमा बेग आणि नेपाळच्या त्रिशाला गुरुंग यांच्यासमवेत उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते, परंतु यामुळे पीसीबीला रिक्त स्टँड भरण्यास मदत झाली नाही. पाकिस्तानमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी सारखे खेळाडू आहेत, परंतु चाहत्यांना स्टेडियममधून सुरुवातीचे सामने पाहण्यात रस नव्हता.

सुरुवातीच्या सामन्यासाठी गर्दी आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल अनेक क्रीडा चाहत्यांनी पीसीबीवर टीका केली. उर्वरित आशिया कप 2023 सामने आयोजित करण्याच्या त्यांच्या योजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय चाहत्यांनीही याबाबत सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com