IND Vs SL Final : भारताने आशियाकपवर आठव्यांदा कोरलं नाव

Asia Cup 2023 Final IND Vs SL
Asia Cup 2023 Final IND Vs SLesakal

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : भारताने श्रीलंकेने ठेवलेले 51 धावांचे माफक आव्हान 6.1 षटकात एकही फलंदाज न गमावता पार केले. माफव आव्हान पार करण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिल आणि इशान किशनला फलंदाजीला पाठवले. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 6.1 षटकातच 51 धावांचे आव्हान पार केले. गिलने नाबाद 27 तर किशनने 22 धावा केल्या.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 50 धावात खुर्दा उडवला. सिराजने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 50 धावात गुंडाळले. त्यााला हार्दिक पांड्याने 3 तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. श्रीलंकेची ही वनडे क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे भारताने गतवर्षीच्या आशिया कपचे विजेते श्रीलंकेची ही दयनीय अवस्था त्यांच्यात देशात केली.

भारताने अवघ्या 6.1 आव्हान केलं पार 

भारताने श्रीलंकेचे 51 धावांचे आव्हान पहिल्या 6.1 षटकात बिनबाद पार केले. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 27 तर इशान किशनने नाबाद 22 धावा केल्या.

50-10  हार्दिकने शेपुट गुंडाळली. 

मोहम्मद सिराजने श्रीलंकेला 6 धक्के दिल्यानंतर हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेत लंकीची शेपूट लवकर गुंडाळली. लंकाचा संपूर्ण संघ 50 धावात गारद झाला.

41-8 (13 Ov) : लंकेची बिकट अवस्था 

सिराजने सहा तर बुमराहने 1 विकेट घेत श्रीलंकेची अवस्था बिकट केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही दुनिथ वेल्लालागेला 13 धावांवर बाद करत आठवा धक्का दिला.

 33-7 : सिराज काही थांबेना 

मोहम्मद सिराजने श्रीलंकेचा एकाकी झुंज देणाऱ्या कुसल मेंडीसला 17 धावांवर बाद करत लंकेला सातवा धक्का दिला. त्याची ही सहावी विकेट ठरली.

मोहम्मद सिराजने पंजा केला पूर्ण 

मोहम्मद सिराजने आपल्या तिसऱ्या षटकात देखील दसुन शनकाला शुन्यावर बाद करत आपली पाचवी विकेट टिपली.

12-5 (3.4 Ov) : मोहम्मद सिराजचा जलवा

मोहम्मद सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकात लंकेची पार दैना उडवून दिली. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा आणि चौथ्या चेंडूवर असलंकाला बाद केले. सिराज आता हॅट्ट्रिक करणार असे वाटत होते. मात्र धनंजया डिसेल्वाने चौकार मारत सिराजची हॅट्ट्रिकची संधी हिरावून घेली. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने धनंजयाला पॅव्हेलियनमध्ये पाठवत लंकेची अवस्था 5 बाद 12 अशी केली.

1-1  : बुमराहने पहिल्याच षटकात दिला धक्का 

जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने तिसऱ्या चेंडूूवर कुसल परेराला शुन्यावर बाद केले.

IND Vs SL Final Live Score : नाणेफेकीनंतर कोलंबोमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात! कधी सुरू होणार सामना?

नाणेफेकीनंतर कोलंबोमध्ये पाऊस पडला आहे. अशा स्थितीत सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. सामना कधी सुरू होणार हे अजून तरी कळले नाही. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

जाणून घ्या प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना

फायनलमध्ये श्रीलंकेने जिंकले नाणेफेक! कर्णधार रोहितने कोणाला दिली संधी,

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भारत प्रथम गोलंदाजी करेल. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मलाही प्रथम फलंदाजी करायची होती.

थोड्यावेळात रंगणार भारत अन् श्रीलंका अंतिम सामना!

भारत आणि श्रीलंकेचे संघ प्रेमदासा स्टेडियमवर पोहोचले आहेत. भारताने ही स्पर्धा सहा वेळा एकदिवसीय आणि एकदा टी20 मध्ये जिंकली आहे, तर श्रीलंकेने एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच वेळा आणि टी-20मध्ये एकदा विजय मिळवला आहे.

गेल्या वर्षी ही स्पर्धा यूएईमध्ये टी-20 मध्ये खेळली गेली होती. ज्यात श्रीलंकेने बाजी मारली होती. भारतीय संघाने गेल्या पाच वर्षांत एकही विजेतेपद जिंकलेले नाही, त्यामुळे आणखी एक ट्रॉफी समाविष्ट करण्याची रविवार ही त्यांच्यासाठी चांगली संधी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com