Asia Cup 2023: भारत अन् पाकिस्तान अंतिम फेरीत कसे भिडणार? जाणून घ्या सर्व समीकरणं

Asia Cup 2023
Asia Cup 2023

Asia Cup 2023 India and Pakistan : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये भारतीय संघाने आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने कमी धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची इच्छा असेल. पण त्यासाठी काही समीकरणे आहेत जाणून घेऊ.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 : आशिया कप फायनलआधी 'या' खेळाडूने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन! संघातून जाणार बाहेर?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल कशी होणार?

भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर बांगलादेश संघ सुपर 4 मधील पहिले दोन सामने गमावून स्पर्धेबाहेर झाला आहे. आता श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत रंगणार आहे. 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील जिंकणार संघ अंतिम फेरीत टीम इंडियाशी भिडणार आहे.

श्रीलंका संघाने सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तान संघानेही पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आणि नंतर भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये नसतानाही सूर्यकुमार यादवने जिंकला 'हा' अवॉर्ड

आता जर आपण आशिया कप 2023 च्या सुपर 4 च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, टीम इंडियाने दोन सामन्यांत दोन विजय मिळवून चार गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट चांगला 2.690 आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तान प्रत्येकी एक विजय आणि पराभवानंतर 2-2 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा नेट रन रेट -0.2 आहे. तर पाकिस्तानचा नेट रन रेट खूपच खराब -1.892 आहे.

बांगलादेशचा संघ सुपर 4 मधील दोन्ही सामने गमावल्यानंतर आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टीम इंडिया आता शेवटचा सुपर 4 सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबरला खेळणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आपली बेंच स्ट्रेंथ आजमावू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com