
नवी दिल्ली : थायलंडमधील बँकॉक येथे ३० जुलै ते १२ ऑगस्ट यादरम्यान आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील व २२ वर्षांखालील अशा दोन गटांमध्ये २६ देशांतील ३९६ खेळाडूंचा कस लागणार आहे. भारताचा ४० खेळाडूंचा संघदेखील सज्ज झाला आहे.