
Asian championship: पी व्ही सिंधूंचा पराभव, रेफ्रींशी झालेल्या वादानंतर लय गमावली
आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी व्ही सिंधूचा जापानच्या येकेन यामागुचीकडून पराभव झालाय. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सिंधूला सेमी फायनलमध्ये येकेन यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पी व्ही सिंधूला ब्रांझ पदकावर समाधान मानावे लागले. सिंधूला 21-13, 19-21, 16-21 ने येकेन यामागुचीने हरवलं. पी. व्ही सिंधूने चांगली सुरुवात केली होती. तिने पहिला सेट जिंकलाही, पण नंतर तिने लय गमावली.त्याच क्षणी तिची प्रतिस्पर्धी यामागुचीने वेगवान खेळ करत सामना जिंकलाय.
रेफ्रिंबरोबर झाला वाद-
सिंधूला उशिरा खेळ (सर्विस) सुरु केल्यामुळे पेनल्टी लागली आणि तिला रेफ्रीने शटल जापानी खेळाडूकडे द्यायला सांगितलं. "ती तयार नव्हती सर...मी कशी सर्विस सुरु करु...'' असं सिंधूने रेफ्रिंना सांगितलही पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर मात्र सिंधूच्या खेळाची लय बिघडली आणि तिच्या हातातून सामना निसटला. रेफ्रींशी झालेल्या वादानंतर सिंधूच्या आक्रमक खेळाची लय गेली आणि तिचा पराभव झालाय.
एशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोरोनामुळे रद्द झाली होती. आता दोन वर्षानंतर ही स्पर्धा होते आहे. फिलिपिन्समध्ये मनीला येथे ही स्पर्धा सुरुयऑलंपिकमध्ये दोन वेळा पदक विजेती पी व्ही सिंधूने क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या हि बिंग जियाओचा पराभव केल्यानंतर सिंधूकडून जेतेपदाची अपेक्षा वाढली होती.
Web Title: Asian Championship P V Sindhu Loses In Semifinal To Japans Akane Yamaguch
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..