
Annu Rani wins Gold in Javeline Throw: २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनच्या हँगझाऊ शहरात खेळवल्या जात आहेत. मंगळवारी पार पडलेल्या इंवेट्समध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे तिचं दुसरं आशियाई पदक आहे आणि पहिलं सुवर्ण पदक आहे. अन्नूने आपल्या चौथ्या प्रयत्नात ६२. ९२ मीटर भाला फेकून लीड निर्माण केली.
तिच्या या फेकीने श्रीलंकेची भालाफेकपटून दुसऱ्या क्रमांकावर आली. श्रीलंकेच्या दिलहानी लेकेमगेने रौप्य पदक जिंकलं. तिने ६१.५७ मीटर भाला फेकला. तर कांस्य पदक चीनच्या ल्यू हुईहुई या खेळाडूने जिंकले.
ही अन्नूची दुसरी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. ३२ वर्षीय अन्नूने २०१४ साली इंचियॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत ५९.५३ मीटर भाला फेकून कांस्य पदक जिंकले होते. २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तिला पदक जिंकण्यात अपयश आले होते. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.