Asian Games 2023 : अरविंद सराव करू शकला नव्हता तरी देशाला जिंकून दिलं सिल्वर

Asian Games 2023
Asian Games 2023esakal
Updated on

Asian Games 2023 : भारताने चीनमधील हांगझू येथे सुरू असेल्या एशियन गेम्समध्ये आज (दि. 24) भारताच्या रोईंग संघाने दमदार कामगिरी केली. भारताने दोन रौप्य पदकांसह एक कांस्य अशी 3 पदके जिंकली. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंहने पुरूष लाईटवेट दुहेरी स्कल इवेंटमध्ये रौप्य पदक जिंकत खाते उघडले. यानंतर पुरूष पेयरमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव या जोडीने कांस्य पदक पटकावले. यानंतर पुरूष सांघिक 8 प्रकारात भारतीय संघाने रौप्य पदक पटकावले.

Asian Games 2023
Ind vs Aus Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ODI सामन्यातून बाहेर, मोठे कारण आले समोर

अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह यांच्यासाठी पदकाची ही वाट सोपी नव्हती. अरविंद हा पाठीच्या दुखापतीमुळे चांगला सराव करू शकला नव्हता. तो जवळपास एक महिना सराव करू शकला नाही. अशा परिस्थितीत देखील अरविंदने एशियन गेम्समध्ये दमदार कामगिरी करत देशाला रौप्य पदक जिंकून दिलं. भारतीय जोडीने 6 : 48.18 सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली. ते दुसऱ्या स्थानावर राहिले. तर चीनचे जुंजी फान आणि मान सून यांनी 6 : 28.18 सेकंद वेळात शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक जिंकले.

Asian Games 2023
Asian Games 2023 Hockey : हॉकीमध्ये उझबेकिस्तानविरुद्ध भारताने पाडला गोलांचा पाऊस, १६-० ने केला पराभव

अरविंदने पदक जिंकल्यावर सांगितले की, 'आमचे स्वप्न सुवर्ण पदक जिंकण्याचे होते. मात्र दोन महिन्यापूर्वी माझ्या कंबरेला दुखापत झाली. त्यामुळे पुरेसं ट्रेनिंग करू शकलो नाही. आता पुढचे लक्ष्य हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं आहे.'

तो पुढे म्हणाला की, 'माझ्या कंबरेच्या दुखापतीमुळे आम्हाला 20 ते 25 दिवस सराव करता आला नाही. आता आम्ही पॅरिस ऑलिम्पिकवर जास्त लक्ष केंद्रीत करणार आहोत. याचबरोबर 2026 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com