

Asian Games 2026
ESakal
नवी दिल्ली : जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी या खेळासाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. अनुभवी खेळाडू भवानी देवी हिचा या भारतीय संघात समावेश करण्यात आला असून तेजस पाटील व श्रुती जोशी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू मंगळवारपासून १५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय तयारी शिबिरासाठी पटियाला येथे एकत्र येतील आणि त्यानंतर १६ सप्टेंबरला स्पर्धेपूर्वीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थेट आयची-नागोया येथे रवाना होतील.