Asian Games 2026 opening ceremony latest update
esakal
Asian Games 2026 flag raising ceremony delayed : आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरपासून संयोजनाबाबतीत त्रुटींमुळे संकटात सापडली आहे. आता त्यात देशांच्या ध्वजारोहण समारंभास झालेल्या विलंबाची भर पडली आहे. भारतासह सहा देशांच्या ध्वजारोहणाचा सोहळा शुक्रवारी (ता. १८) तब्बल तासाभराच्या विलंबानंतर पार पडला. आशिया ऑलिंपिक परिषद (ओसीए) आणि स्थानिक आयोजन समिती (एएनएजीओसी) यांच्यातील गैरसमन्वयामुळे हा गोंधळ झाल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. जपानच्या वेळेनुसार दुपारी १.३० वाजता गार्डन पिअर येथे हा सोहळा नियोजित होता; मात्र सुरुवातीला सुमारे २० मिनिटांचा विलंब झाला. पारंपरिक वाद्यवृंदाने कार्यक्रमाची तयारी केली होती, तर निन्जा योद्ध्यांच्या वेशातील कलाकारही सादरीकरणासाठी सज्ज होते.