दुहेरी सुवर्णपदक विजेते हरिचंद यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asian Games double gold medallist Hari Chand

दुहेरी सुवर्णपदक विजेते हरिचंद यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन

आशियाई क्रीडा स्पर्धेतील दोन सुवर्णपदक विजेते हरी चंद यांचे निधन झाले आहे. रविवारी रात्री जालंधरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 एप्रिल 1953 रोजी जन्मलेले हरिचंद 69 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर 14 जून 2022 रोजी ढोलबहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: 'मी सचिननंतर मलिकची वाट पाहतोय' सुनील गावसकर असं का म्हणाले?

हरिचंद यांनी 1976 आणि 1980 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. 1978 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 5,000 आणि 10,000 मीटरमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले. त्यांनी दोनदा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.1976 मॉन्ट्रियल ऑलिम्पिक आणि 1980 मॉस्को ऑलिम्पिकमधील ऍथलीट, हरि चंदने 1975 च्या सोलमधील आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 10,000 मीटरमध्ये सुवर्ण आणि 5,000 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

1976 च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमध्ये, त्यांनी 10,000 मीटरमध्ये 28.48.72 वेळेसह राष्ट्रीय विक्रम केला, जो 30 वर्षे कोणीही मोडला नाही. हरी चंदने अखिल भारतीय पोलीस खेळांमध्ये 1500, 5000 आणि 10000 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकून नवे राष्ट्रीय विक्रमही रचले.

हेही वाचा: स्टुअर्ट ब्रॉडच्या पबला आग लागल्याने मोठे नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

होशियारपूरच्या ढोलबाहा गावात जन्मलेले हरिचंद सीआरपीएफमधून निवृत्त झाले. डेप्युटी कमांडंट हरी चंद यांना त्यांच्या खेळातील कामगिरीबद्दल भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.

Web Title: Asian Games Double Gold Medallist Hari Chand Dies Aged 69

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Olympic Games
go to top