
PKL 2025
sakal
जयपूर: प्रो कबड्डी २०२५ स्पर्धेतील १२ व्या हंगामातील ५० वा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात यू मुंबाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दबंग दिल्लीकडून आशू मलिकने दमदार खेळ केला. जयपूरच्या एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात दबंग दिल्लीकडून आशू मलिकने २३ गुणांची कमाई केली.