Neeraj Chopra World No1: नीरज चोप्राने रचला इतिहास! पहिल्यांदाच बनला जगातील नंबर 1 खेळाडू

Neeraj Chopra World No1:
Neeraj Chopra World No1:

Neeraj Chopra World No1 : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्सने जाहीर केलेल्या भालाफेक क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे. कारकिर्दीत तो प्रथमच जगातील नंबर-1 खेळाडू बनला आहे. चोप्रा 1455 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तो ग्रॅनडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स (1433) पेक्षा 22 गुणांनी पुढे होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेज 1416 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चोप्रा (25) गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी जागतिक क्रमवारीत 2 व्या स्थानावर पोहोचला होता, परंतु तेव्हापासून पीटर्सला मागे टाकता आले नाही.

Neeraj Chopra World No1:
Shubman Gill IPL 2023 : सलग दोन सामन्यांत शतके ठोकणाऱ्या गिलने केले मोठे वक्तव्य; म्हणाला...

नीरज चोप्राने चालू हंगामाची सुरुवातही उत्तम पद्धतीने केली आहे. दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली. नीरजने 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा झुरिचमध्ये उतरला होता आणि त्यानंतर डायमंड लीगमध्ये 89.63 मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले होते. ते आता 4 जून रोजी नेदरलँड्समध्ये फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्समध्ये भाग घेतील.

आपल्या कामगिरीबद्दल नीरज चोप्राने यापूर्वी सांगितले होते की, पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत आपला खेळ सुरू ठेवायला आवडेल. पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये होणार आहे. डायमंड लीगमधील विजयानंतर तो म्हणाला होता की, मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. येथे कामगिरी करणे प्रत्येकासाठी आव्हान होते, परंतु मला खेळ आणखी पुढे न्यायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com