Sachin Khilarisakal
क्रीडा
आटपाडी टू पॅरिस! Sachin Khilari च्या रौप्यपदकाचा गावात जल्लोष; मेहनतीचं फळ मिळालं...
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने भारताला गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून दिले.
Paris Paralympic 2024 : आटपाडी : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने भारताला गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून दिले. सचिनने Men's Shot Put - F46 Final १६.३२ मीटर ( दुसऱ्या प्रयत्नात) या कामगिरीसह रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर सांगली जिल्ह्यातील आटपाडीत दणक्यात जल्लोष केला गेला. पदक जिंकल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याने आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं फळ व्यक्त करणारा होता. लहानपणापासूनच काटेरी वाट तुडवत त्याने आटपाडी ते पॅरिस असा केलेला प्रवास हा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.