
महेंद्र सिंह धोनीसारखाच पांड्यादेखील थंड डोक्याचा कॅप्टन: ब्रेड हॉग
आयपीएल 15 व्या सीझनमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ सध्या फार्मात आहे. त्यामुळे पांड्याच्या नेतृत्त्वाची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. अशातच अफ्रिका सिरीज दरम्यान पांड्या टीम इंडियाची कमान सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ब्रेड हॉग ने पांड्याची तुलना कुल कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि मुंबई इंडिन्सचा कॅप्टन रोहित शर्मासोबत केली आहे.
पांड्याने यंदाच्या सीझनमध्ये कॅप्टन्सी इंनिग खेळत सर्वांना चकित केले आहे. त्याची इनिंग पाहून ऑस्ट्रेलियाचे ब्रेड हॉगदेखील चकित झाले आहेत. त्याचे नेतृत्व पाहून रोहित आणि धोनी ब्रेड हॉगच्या नजरेसमोर उभे राहतात. यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे.
हार्दिक कर्णधाराची भूमिका योग्यपणे बजावत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या संघाने आत्तापर्यंत 13 सामने खेळलं आहेत. यामधील 10 सामने जिंकले आहेा. संघाचे यशाचे शिखर पाहता हॉग म्हणाले हार्दिकच्या कॅप्टन्सीमध्ये मला महेंद्र सिंह धोनी दिसतो. तो धोनी सारखाच कुल आणि शांत डोक्याचा आहे.
दोघांच्या कॅप्टन्सीची तुलना केली असता दोघांमध्ये समानता पाहायला मिळते. दोघेही सामन्यादरम्यानचा दबाव शांतपणे हाताळतात. नेहमी दोघांची मानसिकता स्वच्छ असते. मैदानात कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी दोघे आपला आत्मविश्वास गमावत नाहीत.
त्यांना माहिती असतं की मॅच कशाप्रकारे सुरु आहे. पण पटकन रिअॅक्ट होत नाहीत. तसेच पांड्या रोहित शर्मासारखाही आहे. रोहितप्रमाणे पांड्यादेखील गोलंदाजांना पुर्णपणे स्वातंत्र्य देतो. यंदाच्या सीझनमध्ये पांड्याने आत्तापर्यंत 11 सामन्यात 344 धावा केल्या आहेत.