esakal | Ashes 2019 : लढवय्या इंग्लंडला घाबरुन ऑसींनी दिले 'या' फायटरला संघात स्थान
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Reveals Squad For The Fourth Ashes Test

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला उद्या (ता.4) सुरवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला 12 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. स्टिव्ह स्मिथने संघात पुनरागमन केले आहे. 

Ashes 2019 : लढवय्या इंग्लंडला घाबरुन ऑसींनी दिले 'या' फायटरला संघात स्थान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला उद्या (ता.4) सुरवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला 12 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. स्टिव्ह स्मिथने संघात पुनरागमन केले आहे. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑर्चरचा बाउन्सर लागल्याने स्मिथ जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. मात्र, आता तो तंदुरुस्त झाला असून त्याने संघात पुनरागमन केले आहे. त्याच्याजागी संघात स्थान मिळालेल्या मार्नस लाबुशेनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरेलेल्या उस्मान ख्वाजाला संगातून वगळण्यात आले आहे. 

संर्पूण ऍशेल मालिकेत ख्वाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. स्मिथच्या अनुपस्थितीत तिसऱ्या कसोटी सामन्यात जागा मिळालेल्या लाबुशेनने ही संधी दोन्ही हातांनी पटकाविली. 

स्मिथच्या पुनरागमनाने लाबुशेन आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मिशेल मार्शला अद्यापही संघात स्थान मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे.  

ऑस्ट्रेलियाचा संघ : डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पीटर सिडल, नॅथन लायन, पॅट कमिन्स

loading image
go to top