VIDEO : नंबर वन बॉलरला मार्क वूडचा कडक सिक्सर, गिलस्पीही फिदा

Pat Cummins VS MarkWood
Pat Cummins VS MarkWoodSakal

Australia vs England, 4th Test : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाजाची तडाखेबाज फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्याच्या भात्यात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे अशा जोस बटलरला (Jos Buttler) खातेही उघडून न दिलेल्या पॅट कमिन्सचा मार्क वूडनं (Mark Wood) चांगलाच समाचार घेतला. इंग्लंडच्या डावातील 64 व्या षटकात मार्क वूडनं दोन जबरदस्त षटकार मारले. दोन षटकारासह इंग्लंडला या षटकात 14 धावा मिळाल्या. मार्क वूडनं पहिल्या डावात 41 चेंडूत 39 धावा कुटल्या.

आपल्या या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. पॅट कमिन्सला मार्कनं मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज जेसन गिलेस्पीनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत मार्क वूडचं कौतुक केले आहे.

सध्याच्या घडीला पॅट कमिन्स (Pat Cummins) हा कसोटीतील अव्वल गोलंदाज आहे. मग मार्कच्या षटकाराने त्याचे खांदे थोडीच पडणार होते. पुढच्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर कमिन्सनं मार्कच्या तडाखेबाज फटकेबाजीला ब्रेक लावला. लायनने त्याचा कॅच पकडला. मार्क वूडनं केलेली 39 धावांची खेळी इंग्लंडसाठी उपयुक्त अशीच आहे. जोस बटलर आणि मार्क वूडनं सातव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली.

Pat Cummins VS MarkWood
AUS vs ENG : बेन स्टोक्स-जॉनीची रुबाबदार खेळी!
Pat Cummins VS MarkWood
पंत शॉट सिलेक्शनमध्ये पुन्हा चुकला; द्रविड गुरुजी घेणार शाळा!

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 416 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा 137 आणि स्टीव्ह स्मिथनं 67 धावांची खेळी केली. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्स आणि बेयरस्टोनं संघाचा डाव सावरला. बेन स्टोक्स माघारी फिरल्यावर बेयरस्टोनं मार्क वूडच्या साथीनं डाव पुढे नेला. तिसऱ्या दिवसाअखेर बेयरस्टोनं शतक पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com