Video : बेन स्टोक्सने शेवटच्या चेंडूवर शॉट खेळला पण..., व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes Viral Video

Video : बेन स्टोक्सने शेवटच्या चेंडूवर शॉट खेळला पण..., व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही

Ben Stokes Viral Video : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्याचवेळी या सामन्यात एक प्रसंग असा आला, जेव्हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने मूर्खपणा केला. ज्यामुळे समालोचक हसू लागले आणि तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर स्टोक्सचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Mohammed Shami : अखेर ठरलं! शमीच घेणार बुमराहची जागा; BCCI ने केली घोषणा

पावसामुळे सामना 12-12 षटकांचा करण्यात आला होता. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून शेवटचे षटक टाकले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्टोक्सने मॅक्सवेलला एक आक्रमक शॉट खेळायला. चेंडू सीमारेषा पार जाईल असे स्टोक्सला वाटत होते. दरम्यान नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला इंग्लंडचा कर्णधार जोश बटलर धाव घेण्यासाठी धावला. बटलर जवळजवळ स्टोक्सच्याजवळ पोहोचला होता.

हेही वाचा: Asif Ali : पाकला मोठा धक्का! मॅच फिनिशने वर्ल्डकपपूर्वी सोडले मैदान

त्यावेळी चेंडूने सीमारेषा पलीकडे गेला नाही ही स्टोक्सला समजले. त्यानंतर स्टोक्स धावण्यासाठी धावला. जरी त्याला फक्त एक धाव मिळाली. जिथे संघाला तीन धावा मिळू शकल्या असत्या तिथे स्टोक्सच्या चुकीमुळे फक्त एक धाव झाली. स्टोक्सची ही चूक पाहून समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. त्याचबरोबर स्टोक्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. अशाप्रकारे इंग्लंडने मालिका 2-0 ने जिंकली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून गौरविण्यात आले.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने 12 षटकात 2 बाद 112 धावा केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य मिळाले. पाठलाग केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या तीन विकेट 30 धावांतच पडल्या. मात्र पावसामुळे हा सामना पुढे खेळता आला नाही.