रोहित शर्माची एकाकी झुंज; पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी

शनिवार, 12 जानेवारी 2019

रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न तोकडे पडले. भारताचा डाव नऊ बाद 254  वर थांबला. बरेच खेळाडू सराव सामना न खेळता थेट मुख्य सामन्यात खेळल्याने अंदाज चुकला आणि 34 धावांनी भारताचा पराभव झाला. 

सिडनी : तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सिडनी क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आणि नाणेफेकीसह ऑस्ट्रेलियन संघाचे नशीब बदलताना दिसले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होण्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने पाच बाद 288 धावा केल्या. रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न तोकडे पडले. भारताचा डाव नऊ बाद 254  वर थांबला. बरेच खेळाडू सराव सामना न खेळता थेट मुख्य सामन्यात खेळल्याने अंदाज चुकला आणि 34 धावांनी भारताचा पराभव झाला. 

सिडनी क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करायचा निर्णय घेतला. तरुण गुणवान खेळाडू अलेक्स केरीला सलामीला फलंदाजीला जायची संधी दिली गेली. कर्णधार फिंचचा खराब फॉर्म एकदिवसीय सामन्यातही चालू राहिला. भुवनेश्वर कुमारने त्याचा सहा धावांवर त्रिफळा उडविला. 24 धावांची आश्वासक खेळी करून केरी कुलदीपला बाद झाला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

INDvsAUS : नव्या ऑस्ट्रेलियाचा भारताला दणका; ४० धावांनी पराभव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia wins the first ODI against australia