esakal | Video : अजब-गजब विकेट; चौकार मारला पण दांड्या उडल्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Video : अजब-गजब विकेट; चौकार मारला पण दांड्या उडल्या!

Video : अजब-गजब विकेट; चौकार मारला पण दांड्या उडल्या!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा पराभूत केले. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 149 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ निर्धारित 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाच्या डावात एक अजब-गजब विकेट पडल्याचे पाहायला मिळाले. मेग लेनिंग तिसच्या टी 20 सामन्यात अवघ्या 14 धावांवर बाद झाली. राजेश्वरीच्या गोलंदाजीवर तिने सुरेक कट शॉट् खेळला. चेंडू गॅपमध्ये मारत तिने चार धावाही कमावल्या. पण तिला हिट विकेट होऊन तंबूत परतावे लागले. हा शॉट खेळताना मेग लेनिंग क्रिजच्या खूप आत गेली. फटका खेळताना तिने आपल्या बॅटने बॉल मारण्यापूर्वी स्टम्पवरी बेल्स पाडल्या.

हेही वाचा: Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात हिच विकेटच्या स्वरुपात एखादी बॅटर आउट होण्याची ही सातवी वेळ आहे. लेनिंगने 14 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यावेळी ती बाद झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर 7 षटकात 2 बाद 44 धावा होत्या. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रितने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रेणुका सिंहने दुसऱ्या षटकातच एलिसा हीलीच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. लेनिंग अनलकी पद्धतीने बाद झाली.

बेथ मूनी 61 आणि मेग्राच्या पुन्हा नाबाद 44 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने 149 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाच्या 52 धावा वगळता भारतीय संघातील अन्य एकाही बॅटरला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

loading image
go to top