इंग्लंडची नाचक्की; ऑस्ट्रेलियाने अॅशेस पुन्हा राखल्या | Ashes Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ashes Series
Ashes: इंग्लंडची नाचक्की; ऑस्ट्रेलियाने अॅशेस पुन्हा राखल्या

Ashes: इंग्लंडची नाचक्की; ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस पुन्हा राखल्या

मेलबर्न : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) बॉक्सिंग डे कसोटी नावाने ओळखली जाणारी तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव करत जिंकली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने (Australian Men Cricket Team) पाच कसोटी सामन्यांची मालिका 3 - 0 ने खिशात घातली.

अ‍ॅशेस मालिकेत (The Ashes) 2 - 0 अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडसाठी तिसरी कसोटी महत्वाची होती. मात्र प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव 185 धावात संपुष्टात आला. इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे याही सामन्यात निराशा केली. दरम्यान, इंग्लंडच्या गोलंदाजांनी कांगारुंना थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. मात्र इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी संघाला 267 धावांपर्यंत नेत महत्वपूर्ण 82 धावांची आघाडी मिळवून दिले.

हेही वाचा: ...तर रोहित शर्मा ऐवजी हा खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन

82 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव दुसऱ्याच दिवशी गुंडाळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी दिवस अखेर इंग्लंडची अवस्था 4 बाद 31 अशी केली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने (Scott Boland) इंग्लंडला पाठोपाठ हादरे दिले.

त्याने अवघ्या सात धावात सहा इंग्लंडचे फलंदाज टिपले आणि इंग्लंडचा दुसरा डाव 68 धावात संपवला. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाची साधी 82 धावांची आघाडी देखील पार करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर एक डाव आणि 14 धावांनी पराभव स्विकारण्याची वेळ आली.

हेही वाचा: टीम इंडियानं लंचमध्ये काय खाल्लं? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

तिसऱ्या कसोटी इंग्लंडकडून पहिल्या डावात जो रुटने (Joe Root) अर्धशतकी खेळी केली. हीच इंग्लंडकडून पहिल्या डावात केलेली सर्वोच्च खेळी होती. पहिल्या डावात इंग्लंडला 185 धावात गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ( आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसने 76 धावांची खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला.

हॅरिसच्या 76 आणि तळातील फलंदाज कमिन्स (21) आणि स्टार्क (Mitchell Starc) (24) यांनी मोक्याच्या क्षणी केलील्या भागीदारीमुळे कांगारुंनी 267 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने भेदक मारा करत 4 बळी टिपले. मात्र ऑस्ट्रेलियाला 82 धावांची आघाडी घेण्यात यश आले.

हेही वाचा: '83' मधील हिरोंचे आयुष्य जगताना कोणत्या कलाकारानं किती कमावलं?

82 धावांची आघाडी डोक्यावर घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनाकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा होती. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या दोन कसोटीप्रमाणे याही सामन्यात हाराकिरी केली. त्यांचा पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने (Scott Boland) इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. त्याने अवघ्या 7 धावात इंग्लंडचा निम्मा संघ बाद करत आपल्या फलंदाजांना विश्रांती मिळेल याची सोय करुन ठेवली.

इंग्लंडचा दुसरा डाव 68 धावात संपला. इंग्लंडकडून जो रुट (28) आणि बेन स्टेक्स (11) या दोघांनाच दुहेरी आकडा पार करता आला.

Web Title: Australia Won Ashes Series After Defeating England In 3rd Test By Inning And 14 Runs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top