थोरल्याला डच्चू आणि धाकट्याला संधी, वॉ बंधूंची अनोखी कहाणी

क्रिकेटच्या मैदानात एकत्रित मैदानात उतरणाऱ्या इतर भावाभावांच्या जोडीपेक्षा ही दोघे सरस ठरली आहेत.
 mark and steve waugh
mark and steve waugh File Photo
Summary

क्रिकेटच्या मैदानात एकत्रित मैदानात उतरणाऱ्या इतर भावाभावांच्या जोडीपेक्षा ही दोघे सरस ठरली आहेत.

क्रिकेटच्या मैदानात भावाभावांची जोडी काही नवी गोष्ट नाही. भारतीय संघात पांड्या बंधू, पठाण बंधू प्रमाणे इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला टॉम आणि सॅम कुरेन ही भावा भावांची जोडी आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळताना दिसते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक प्रभावित ठरलेल्या जोडीविषयी बोलायचे तर स्टीव वॉ आणि मार्क वॉ या ऑस्ट्रेलियन बंधूनी राज्य केले. या जोड गोळीच्या बर्थडेची आणि आंतराष्ट्रीय कारकिर्दीची कहाणीमागेही रेकॉर्ड आहे. दोघांनी दशकाहून अधिक काळ एकत्र क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटच्या मैदानात एकत्रित मैदानात उतरणाऱ्या इतर भावाभावांच्या जोडीपेक्षा ही दोघे सरस ठरली आहेत. (Australian Cricketer Steve Waugh And Mark Waugh Record Birthday Story)

...म्हणून मार्क वॉला ज्यूनियर म्हणतात

स्टीव वॉ आणि मार्क वॉला क्रिकेटमधील यशस्वी भाऊ असे मानले जाते. या जोडीच्या नावे सर्वाधिक कसोटी आणि वनडे सामने एकत्रित खेळण्याचा रेकॉर्ड आहे. मार्क आणि स्टीवचा जन्म 2 जून 1965 मध्ये दक्षिण-पश्चिम सिडनी परिसरातील कँपसी उपनगरातील कँटरबरी रुग्णालयात झाला. मार्क वॉ स्टीवपेक्षा 4 मिनिटांनी लहान असल्यामुळे त्याला क्रिकेटमधील ज्यूनियर वॉ म्हणून ओळखले जाते.

 mark and steve waugh
'धोनीच विकेटकीपर हवा; गांगुलीला समजावण्यासाठी लागले 10 दिवस'

लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी

स्टीव आणि मार्क दोघांना लहानपणापासूनच क्रिकेटची ओढ होती. स्थानिक पातळीवर कामगिरी केल्यानंतर स्टीवने 1984 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. एका वर्षानंतर 9 जानेवारी 1986 मध्ये तो न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला.

स्टीवला 'आइसमॅन'चा टॅग

1987 च्या आयसीसी वर्ल्ड कपवेळी आपल्या कामगिरीने स्टीवने सर्वांचे लक्ष वेधले. फलंदाजीसह मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करुन संघासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्याला 'आइसमॅन'चा टॅग लागला.

मार्कने घेतली स्टी वॉची जागा

वर्ल्ड कपनंतर स्टीव वॉला संघातून स्थान गमवावे लागले. अष्टपैलू कामगिरी ढासळल्यामुळे 1991 च्या अ‍ॅशेज मालिकेतून त्याला डच्चू मिळाला. विशेष म्हणजे त्याची दुसऱ्या कोणी नाही तर त्याचा छोटा भाऊ मार्क वॉने घेतली. त्यानेही मालिकेत शतकी खेळी करुन 'लंबे रेस का घोडा' असल्याचे सिद्ध केले. शतकाच्या जोरावर मार्क वॉने प्लेइंग इलेव्हनमधील आपली जागा पक्की केली. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर स्टीव पुन्हा संघात आला. त्रिनिदादच्या मैदानात भावा-भावांनी पहिल्यांदा एकत्रित कसोटी सामना खेळला. या सामन्यात मार्कने 126 तर स्टीवने 200 धावांची खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

 mark and steve waugh
टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ; ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय

भावा-भावांची कारकिर्द

स्टीव सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने 168 कसोटी सामन्यात 10,927 धावा आणि 325 वनडेत 32.90 च्या सरासरीने 7569 धावा केल्या आहेत. मार्कने 128 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. 41.81 च्या सरासरीने त्याने 8029 धावा केल्या असून वनडेतील 244 सामन्यात 39.35 च्या सरासरीने त्याच्या नावे 8500 धावांची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com