Australian Open 2021 : सेरेना-नाओमी यांच्यात रंगणार सेमीफायनलचा सामना

australian open 2021,naomi osaka,serena williams, osaka reaches semi finals, serena williams
australian open 2021,naomi osaka,serena williams, osaka reaches semi finals, serena williams

मेलबर्न : जपानच्या नाओमी ओसाकाने सोमवारी रंगलेल्या क्वार्टर फायनलमध्ये सहज विजय नोंदवत सेमीफायनमध्ये धडक मारली.  नाओमीनं तैवानच्या 35 वर्षीय सीह सु वेई हिला 6-2, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सलग 19 वा विजय नोंदवणाऱ्या नाओमीला सेमीफायनलमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्ससोबत लढावे लागणार आहे.  

महिला क्वार्रटर फायनमध्ये सेरेना आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप यांच्यात लढत झाली. यात सेरेनाने एकहाती विजयाची नोंद केली. 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये सामना जिंकत सरेनाने सेमी फायनल गाठली आहे. रोमानियाची सिमोन सेरेनाला थोपवण्यात सपशेल अपयशी ठरली.  

पुढील सामन्यासाठी उत्सुक असून  प्रतिस्पर्धी कोणी असला तरी सामना रंगतदार होईल, असा विश्वास तिने व्यक्त केलाय.  तिसऱ्या स्थानावर असलेल्या नाओमीनं कमालीची सर्विस केल्याचे पाहायला मिळाले. तिने 7 ऐस आणि पहिल्या सर्विसवर केवळ 2 गुण गमावले. सर्विस कायम ठेवण्यात तिने यश मिळवले. त्यामुळे प्रतिस्पर्धीसमोर तीने एकहाती विजय नोंदवला. 

सेरेना वर्सेस नाओमी रेकॉर्ड

या दोघींचा एकमेकांविरोधातील रेकॉर्ड हा सम-समान आहे. 2018 मध्ये मियामी ओपन स्पर्धेत नाओमीनं सेरेनाला 3-6, 2-6 असे पराभूत केले होते. याच वर्षी अमेरिकन ओपनमध्ये नाओमीनं फायनलमध्ये सेरेनाला मात दिली होती.  2019 मधील रॉजर कप आणि 2021 मधील अ डे अॅट ड़्राइव्ह चॅम्पियनशिप स्पर्धेत सेरेनाने तिला मात दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com