जोकोविचला न्यायालयाचा दिलासा, हॉटेलमधून बाहेर येण्यास परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic
सुनावणी दरम्यान जोकोविचला दिलासा; हॉटेलमधून बाहेर येण्याची परवानगी

जोकोविचला न्यायालयाचा दिलासा, हॉटेलमधून बाहेर येण्यास परवानगी

मेलबर्न : व्हीसा रोखल्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस(Australian Open tennis) ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होण्यास आलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या ऑस्ट्रेलियातील हॉटेलमध्ये विलगीकरणात आहे. नोवाक जोकोविच याने याविरोधात न्यायालयात धाव घेतली असून आता या प्रकरणाची सुनावणी दरम्यान जोकोविचला दिलासा.

हेही वाचा: राज्यात आजपासून नवे निर्बंध, वाचा तुमच्या मनातील १७ प्रश्नांची उत्तरं

नोवाक जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहभागाबाबत अनिश्‍चितता होती. पण टेनिस ऑस्ट्रेलियाकडून त्याला मेडीकल सूट देण्यात आली. अर्थातच त्याच्यासाठी लसीकरणाची अट शिथिल करण्यात आली. पण विमानतळावर त्याला कोरोनासंबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे रोखण्यात आले. लसीकरणासह कोरोनाशी निगडित कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे व्हीसाही रद्द करण्यात आला. अखेर नोवाक जोकोविच याने न्यायालयाकडे प्रयाण केले. उद्या या प्रकरणाची सुनावणी आहे; पण १७ जानेवारीला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू होणार आहे. त्याआधी त्याला न्यायालयात जावे लागत आहे. या पठ्ठ्याला खेळण्याची परवानगी दिल्यानंतरही सरावाअभावी महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये त्याचा निभाव लागू शकेल का, हाही प्रश्‍न यावेळी निर्माण झाला आहे.

हेही वाचा: आजपासून ‘बुस्टर डोस’; अकोला जिल्ह्यात १२ हजार ५०० लाभार्थी पात्र

वास्तव्य काही काळापुरतेच

ऑस्ट्रेलियन सरकार या प्रकरणात नोवाक जोकोविचच्या विरोधात आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना संबंधित कडक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे. नोवाक जोकोविच लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याचे या देशातील वास्तव्य काही काळापुरतेच असणार आहे. त्याला दीर्घकाळ येथे राहता येणार नाही, अशी भूमिका ऑस्ट्रेलियन सरकारकडून घेण्यात आली आहे.

Web Title: Australian Open 2022 Novak Djokovic Latest News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top