iga swiatek
sakal
मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन या २०२६ मधील पहिल्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये महिला एकेरीत मानांकित खेळाडूंनी विजयी वाटचाल केली. दुसरी मानांकित इगा स्विअतेक व तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवताना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची शानदार सुरुवात केली. पुरुष विभागात रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांनी विजयी पाऊल पुढे टाकले.
कोको गॉफ हिने पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडला असला तरी सर्व्हिस करताना तिच्याकडून चुका होत आहेत. कोका गॉफ हिने आतापर्यंत दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले असले तरी तिला अद्याप ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवता आलेली नाही. मागील वर्षी तिला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती.