Australian Open: राफेल नदालने एक पाऊल टाकले पुढे

Australian Open Rafael Nadal Reached In second round
Australian Open Rafael Nadal Reached In second roundesakal

मेलबर्न: नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमधून (Australian Open) माघार घेत मायदेशी परतावे लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सर्वांच्याची नजर आता स्पेनच्या राफेल नदावर (Rafael Nadal) असणार आहे. कारण रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) हे तिघेही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकून सर्वाधिवेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून या तिघांपैकी एकाला सर्वात आधी २१ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा बहुमान मिळणार होता. मात्र रॉजर फेडररने (Roger Federer) दुखापतीमुळे माघार घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन हा बालेकिल्ला असलेल्या जोकोविचला विजा प्रकरणानंतर मायदेशी परतावे लागले. त्यामुळे आता राफेल नदाल या संधीचा फायदा उचल सर्वात पहिल्यांदा २१ ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम करणार का यावर टेनिस (Tennis) प्रेमींचे लक्ष आहे. (Australian Open Rafael Nadal Reached In second round)

Australian Open Rafael Nadal Reached In second round
विराट कोहलीने आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे : कपिल देव

राफेल नदालने आज झालेला आपला ऑस्ट्रेलियन ओपनमधील पहिला सामना आरामात जिंकत विक्रमाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने अमेरिकेच्या गिरॉनचा (Marcos Giron) ६ -१, ६-४ आणि ६-२ अशा सेटमध्ये पराभव करत पुढची फेरी गाठली. त्याने हा सामना ४९ मिनिटात खिशात टाकला. विशेष म्हणजे राफेल नदालचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधला ७० वा विजय होता.

Australian Open Rafael Nadal Reached In second round
अखेर जोकोविच आउट; नदाल 'बिग थ्री'ची अब्रू राखणार?

असे असले तरी राफेल नदालचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील रेकॉर्ड (Australian Open Record) फारसे चांगले नाही. त्याला आतापर्यंतच्या कारकिर्दित फक्त एकदाच ( २००९) ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आली होती. ऑस्ट्रेलियन ओपन ही नोव्हाक जोकोविचची फेव्हरेट ग्रँडस्लॅम आहे. त्याने तब्बल ९ वेळी ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्या खालोखाल रॉजर फेडरर आणि रॉय इमेर्सन यांचा नंबर लागतो. या दोघांनीही प्रत्येकी ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com