Australian Announced T20 World Cup : भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नर बाहेर; T20 WC ऑस्ट्रेलियन संघ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australian team

Australian Announced : भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नर बाहेर; T20 WC ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

Australian team announced for T20 World Cup and India tour : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि टी-20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सप्टेंबरमध्ये होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारत दौऱ्यावर खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनची भारत दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: सामना हारला पण...हाँगकाँगच्या खेळाडूचं प्रेयसीला ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज

ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषक 2022 साठी निवडलेला संघ जवळपास तसाच आहे जो गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात खेळताना दिसला होता. एकच बदल म्हणजे लेगस्पिनर मिचेल स्वेपसनच्या जागी टीम डेव्हिडला संधी देण्यात आली आहे. 2022 च्या T20 विश्वचषकासाठी निवडलेला हाच संघ सप्टेंबरच्या मध्यात भारत दौऱ्यावर खेळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला मात्र भारत दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या संघात त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: IND vs HK : कौतुक! उदर निर्वाहासाठी पैसा नाही तरी हाँगकाँगने भारताला दिली टक्कर

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यावर 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, या मालिकेतील सामने 20, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी मोहाली, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची मोहीम सुरू होणार आहे. यावेळी आपले जेतेपद राखण्याची जबाबदारी गतविजेत्यावर असेल. चांगली गोष्ट म्हणजे यावेळी त्याला टी-20 विश्वचषक त्याच्याच भूमीवर खेळल्या जाणार आहेत.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ आणि T20 WC :

ऑस्ट्रेलिया संघ : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), टीम डेव्हिड, अॅश्टन अगर, जोश हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

Web Title: Australian Team Announced For T20 World Cup And India Tour David Warner Rested Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..