CWG 2022 : मराठमोळ्या अविनाशने रचला इतिहास; भारतासाठी जिंकले रौप्यपदक

अविनाश मुकुंद साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले
Avinash Sable
Avinash Sablesakal

Commonwealth Games 2022 : महाराष्ट्रातील बीड येथील रहिवासी असलेले अविनाश साबळे याने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत साबळेने 8:11:20 वाजता दुसरे स्थान पटकावले. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. (Avinash Mukund Sable wins silver in 3000m Steeplechase)

सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या आमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

अबिनाश साबळे यांचा हा विजय खूप मोठा आहे. गेल्या 6 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केवळ केनियन खेळाडूंनी 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली होती. मात्र साबळेने त्याचा हा विक्रम मोडला आहे. अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना वैयक्तिक विक्रम, राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळे सुवर्णपदकाच्या अगदी जवळ होता आणि तो केनियाच्या इब्राहिम किबिव्होटपेक्षा एक इंच मागे पडला.

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने ऍथलीटमध्ये 4 पदके जिंकली आहेत. साबळेपूर्वी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदक जिंकले. मुरली श्रीशंकरने लांब उडीत रौप्यपदक पटकावले. प्रियांका गोस्वामीने 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com