
नवी दिल्ली : भारताचा धावपटू अविनाश साबळे याला मोनॅको डायमंड लीगमध्ये दुखापतीचा सामना करावा लागला, मात्र त्याची ही दुखापत गंभीर नसल्याचे प्रशिक्षक अमरीशकुमार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तो एक ते दोन आठवड्यांत तंदुरुस्त होईल, असाही विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.