अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड | Axar Patel Engagement on His Birthday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Axar Patel Engagement News

भारताचा (India) फिरकीपटू अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याच्या वाढदिनी साखरपुडा करून चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.

अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड

नवी दिल्ली - भारताचा (India) फिरकीपटू अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याच्या वाढदिनी साखरपुडा करून चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. त्यानं गर्लफ्रेंड मेहासोबत साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. अक्षर पटेलनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत. आता त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावरून केला जात आहे. (Axar Patel Engagement News)

अक्षर पटेलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना म्हटलं की,'आयुष्याची ही नवी सुरुवात आहे. आपण आयुष्यभरासाठी एकत्र झालो. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन' अक्षर पटेलनं यासोबत मेहाचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत.(Axar Patel News)

हेही वाचा: दीपिकाने सांगितला 'गेहराईयाँ'मधील इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव..

वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतच अक्षर पटेलने साखरपुड्याचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं. आता या बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये Marry Me असा एक बोर्डही मागे दिसतो.

अक्षर पटेलला ऋषभ पंत, उमेश यादव, इशान किशन शुभेच्छा देत अभिनंदन केलं. जयदेव उनादकटने अक्षरला गुजराती भाषेत साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर अक्षरनेसुद्धा रिप्लाय दिला आहे.

क्रिकेटच्या मैदानापासून दुखापतीमुळे अक्षर सध्या दूर आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही जाऊ शकला नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही तो खेळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरोधात त्यानं कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. या मालिकेत ३ कसोटीत त्यानं २७ गडी बाद केले होते. ही मालिका भारताने ३-१ ने जिंकली होती.

Web Title: Axar Patel Engagement On His Birthday With Meha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketAxar Patel