Ayush Shetty: आयुष शेट्टीचा जोनाथन ख्रिस्तीला धक्का; आशियाई बॅडमिंटन स्पर्धा, उपांत्य फेरीसह पदक पक्के

Asia Badminton Championship: आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्तीला पराभूत करत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. या विजयासह त्याने पदक निश्चित केले असून आता त्याच्यासमोर थायलंडच्या कुनलावूत वितीदसर्णचे आव्हान आहे.
Ayush Shetty

Ayush Shetty

sakal

Updated on

निंगबो (चीन) : भारताचा युवा स्टार खेळाडू आयुष शेट्टी शुक्रवारी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती याला पराभवाचा धक्का देत आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. आयुष शेट्टी याने या विजयासह प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पदकही पक्के केले हे विशेष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com