Pakistan Cricket: आफ्रिदीच्या रडारवर बाबर अन् रिजवान! होणाऱ्या जावयाला करणार कर्णधार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

babar azam and Mohammad Rizwan

Pakistan Cricket: आफ्रिदीच्या रडारवर बाबर अन् रिजवान! होणाऱ्या जावयाला करणार कर्णधार?

babar azam and Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेटमध्ये रमीझ राजा गेल्यापासून हालचालींना वेग आला आहे. नजम सेठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे अध्यक्ष बनले आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला निवड समितीचे अंतरिम प्रमुख बनवण्यात आले आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आफ्रिदीने अनेक बदल केले आहेत. त्याने कसोटी संघात काही खेळाडूंचे पुनरागमन केले आहे. आता त्याला टी-20 संघात निवडीसाठी नवीन प्रक्रिया राबवायची आहे.

हेही वाचा: Team India: भारतीय संघाने पंतसाठी 1 मिनिट 53 सेकंदाचा व्हिडीओ केला शेअर; पांड्या म्हणाला...

आफ्रिदीचे म्हणणे आहे की ज्या फलंदाजाचा किंवा अष्टपैलू खेळाडूचा स्ट्राईक रेट 135 पेक्षा जास्त असेल त्याची टी-20 संघात निवड केली जाईल. त्याने हे विधान केल्यापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. याची अंमलबजावणी झाल्यास संघाचे दोन प्रमुख फलंदाज कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघाबाहेर बसावे लागेल. स्ट्राईक रेटमुळे पाकिस्तान संघाला सतत टीकेचा सामना करावा लागतो. यामध्ये बाबर आणि रिझवान यांची नावे आहेत.

हेही वाचा: Jaydev Unadkat : हॅटट्रिकच वादळ! बांगलादेशवरून आला अन् अवघ्या 12 चेंडूत दिल्लीचा धुव्वा उडवला

शाहिद आफ्रिदीने सांगितले की, आता स्ट्राईक रेटच्या आधारे टी-20 संघ निवडला जाईल. अशा परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्याचा स्ट्राइक रेट 135च्या वर असेल अशा फलंदाजाची निवड केली जाऊ शकते. यापेक्षा कमी स्ट्राईक रेट असलेल्या फलंदाजांची निवड केली जाणार नाही. आफ्रिदीच्या वक्तव्यावर बाबर आणि रिझवान यांना सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल करण्यात आले. तर काहींनी आफ्रिदीला टोल करत म्हटले की होणाऱ्या जावयासाठी हा चांगला प्लॅन आहे.

हेही वाचा: IND vs SL: हा 'सुपर फ्लॉप' खेळाडू लावू शकतो पांड्याच्या कॅप्टन्सीला ग्रहण

दोघांच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकल्यास बाबरने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी 3355 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी चांगली आहे, पण स्ट्राइक रेट कमी आहे. बाबरने 41.41 च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 127.80 आहे. त्याच वेळी, मोहम्मद रिझवानने 80 सामन्यांमध्ये 48.8 च्या सरासरीने आणि 126.62 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये त्याच्या 2635 धावा आहेत.