Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam

Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला...

Babar Azam Pakistan vs England : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम त्याच्या खराब स्ट्राईक रेटमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजानी बाबरच्या फलंदाजीचे नक्कीच कौतुक केले आहे, परंतु त्याच्या खराब स्ट्राईक रेटवरही तीव्र टीकाही केले आहे. बाबर आझमचा टी-20 मध्ये खूपच खराब स्ट्राईक रेट आहे. अलीकडेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदने सांगितले होते की त्यांच्या संघाने बाबरला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये जाणीवपूर्वक बाद केले नाही. 

हेही वाचा: ICC Rules Changes : टी20 वर्ल्ड कप आधी क्रिकेटचे 'हे' नियम बदलणार, ICC चा मोठा निर्णय

आकिब म्हणाला होता की बाबर संथ स्ट्राइक रेटने धावा करतो. हे आमच्या संघासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे बाबर आझमला बाद केले नाही. असाच प्रश्न पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला, त्यावर बाबर संतापला. याला रागाच्या भरातही बाबरने चोख प्रत्युत्तर दिले. वैयक्तिक हल्ला होता कामा नये, असे तो म्हणाला.

बाबर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, जर त्याला हे वाटत असेल तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता पाकिस्तान संघाबद्दल बोलला तर बरे होईल. लोकांचे स्वतःचे मत आहे. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि संघातील बाहेरच्या गोष्टी आत आणत नाही.

हेही वाचा: T20 World Cup : न्यूझीलंड संघ जाहीर; करार नाकारणाऱ्या 2 खेळाडूंना मिळाली संधी

इंग्लंडचा टी-20 संघ - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, ॲलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

Web Title: Babar Azam Angry On Slow Strike Rate Comment By Aaqib Javed Pak Vs Eng Match Updates Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..