PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाला एकटा बाबर भिडलायं; 506 चे टार्गेटही अपुरे? | Babar Azam fabulous batting on 5th day Wicket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam fabulous batting

PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाला एकटा बाबर भिडलायं; 506 चे टार्गेटही अपुरे?

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Pakistan vs Australia) यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कांगारूंनी विजयासाठी ठेवलेल्या 506 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात 300 चा टप्पा पार केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) चौथ्या दिवशीच शतक झळकावून आपण सामना सोडला नसल्याचे दाखवून दिले होते. त्याने पाचव्या दिवशी देखील चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला फक्त झुंजवले नाही तर हळूहळू विजयाच्या दिशेने कूच देखील करणे सुरू केले आहे.

हेही वाचा: VIDEO: 'ये बेल्स गिरती क्यों नहीं' सिव्हर नशीबाने वाचली अन् मॅच फिरली

कराची कसोटीत (Karachi Test) आस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिला डाव 556 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) 160 धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. त्याला अॅलेक्स केरीने 93 तर स्टीव्ह स्मिथने 74 धावांची खेळी केली. पाकिस्तानची पहिल्या डावात फलंदाजी चांगली झाली नाही. त्यांचा पूर्ण संग 148 धावातच माघारी गेला. पहिल्या डावात बाबर आझमने सर्वाधिक 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 3 तर स्वेपसनने 2 विकेट घेतल्या.

हेही वाचा: PAK vs AUS: बाबरचे 25 महिन्यानंतर शतक त्यावर अश्विनचे ट्विट

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 408 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करत 2 बाद 97 धावा केल्या. 97 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावात दीडशतक ठोकणाऱ्या उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावातही नाबाद 44 धावा केल्या. त्याला लॅम्बुश्गनेने देखील 44 धावा करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 97 धावांची भर घालून पाकिस्तान समोर विजयासाठी 506 धावांचे आव्हान ठेवले.

विजयासाठीच्या एवढ्या मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानचा संघ नांगी टाकले असे वाटत होते. मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर अब्दुल्लाह शफीक यांनी चौथ्या दिवशी प्रतिकार केला. पहिल्या दोन विकेट स्वस्तात माघारी गेल्यानंतर बाबर आझमने शतक तर शफीकने अर्धशतक ठोकून चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा हा झुंजारपणा मोडून काढेल अशी आशा होती.

हेही वाचा: भारताच्या 'या' खेळाडूने 7 दिवसात कमावले 16.7 कोटी; IPL चे श्रीमंतही पडले मागे

मात्र बाबर आझमने चिवट फलंदाजी केली. त्याच्या नाबाद दीडशतकी खेळीमुळे सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तानने चहापानापर्यंत 4 बाद 310 धावांपर्यंत मजल मारली. आता पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या सत्रात 196 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाकिस्तानच्या 6 विकेट घेणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यासमोर बाबर आझमने कडवे आव्हान उभे केले आहे.

Web Title: Babar Azam Fabulous Batting On 5th Day Australia May Lost Karachi Test

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top