Babar Azamने T20I मध्ये रचला इतिहास! रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडून वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली

बाबरने कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकून केला धमाका
babar azam scripted a new t20i world record most hundreds captain in t20i going past india skipper rohit sharma
babar azam scripted a new t20i world record most hundreds captain in t20i going past india skipper rohit sharma

Babar Azam New T20i World Record : पाकिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 38 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यासोबत बाबर आझमने दुस-या टी-20 मध्ये विश्वविक्रम केला. टी-20 इंटरनॅशनलमध्ये बाबरने कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकून धमाका केला.

बाबरने 58 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी खेळली, त्याच्या डावात बाबरने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 174.14 होता. अलीकडच्या काळात बाबरच्या स्ट्राईक रेटबद्दल बरीच चर्चा होत आहे.

बाबरच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावाच करू शकला. पाकिस्तानी गोलंदाजांनी पुन्हा एकदा कहर केला.

babar azam scripted a new t20i world record most hundreds captain in t20i going past india skipper rohit sharma
IPL 2023: सामन्याच्या काही तास आधी रोहितच्या मुंबई इंडियन्सने केली मोठी घोषणा!

रोहित शर्माने टी-20 मध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. रोहितने 4 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर आता बाबरने 3 शतके झळकावून आगामी काळात तो रोहितचा टी-20 आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत काढू शकतो. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, कॉलिन मुनरो, एस डेविजी, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंनी आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत.

babar azam scripted a new t20i world record most hundreds captain in t20i going past india skipper rohit sharma
IPL 2023 : विराट अन् गांगुलीचे भांडण आले सर्वांसमोर; VIDEO वरून क्रिकेट विश्वात खळबळ

टी-20 मध्ये 3 शतके झळकावणारा बाबर जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कर्णधाराने टी-20 मध्ये 3 शतके झळकावलेली नाहीत. यापूर्वी बाबरने 2021 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, त्यानंतर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. रोहितने कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 शतके झळकावली आहेत.

आता बाबर टी-20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बाबरने टी-20 मध्ये एकूण 9 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेलने टी-20 मध्ये एकूण 22 शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा बाबर हा पहिला पाकिस्तानी फलंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com