PAKvsSL : दहा वर्षांनी पाकिस्तानचा मायदेशात विजय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमच्या (115) शतकाच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 305 धावा केल्या.

कराची : अखेर घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचे आणि विजय मिळविण्याचे पाकिस्तानचे स्वप्न सोमवारी साकार झाले.

पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमच्या (115) शतकाच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 305 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 46.5 षटकांत 238 धावांत संपुष्टात आला.

शेहान जयसूर्याचे (96) शतक हुकले. त्याने शंकराच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. या ाजेडीने 5 बाद 28वरून श्रीलंकेचा डाव सावरला. पण, ही जोडी फुटल्यावर त्यांचे अन्य फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. पाकिस्तानकडून उस्मान शिनवारी याने 51 धावांत 5 गडी बाद केले. त्यापूर्वी बाबर आझमे 71 डावात अकरावे शतक साजरे करताना कोहलीचीकामगिरी मागे टाकली. कोहलीला 11 शतक साजरे करण्यासाठी 82 डाव लागले होते.

दरम्यान, पाकिस्तानचा या सामन्यात विजय झाला असला, तरी इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय सामना येथे न झाल्याचा फटका त्यांना बसला. श्रीलंकेच्या डावात दोन वेळा विद्युत सेवा बंद पडली होती. त्यामुळे सामना विनाकारण लांबला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babar Azam, Usman Shinwari star in Pakistan's 67-run win vs Sri Lanka in Karachi