Mia Blichfeldt criticises India Open 2026 conditions
esakal
India Open 2026 dirty courts controversy: भारतामधील नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चिंताजनक बाब घडून आली. डेन्मार्कची महिला खेळाडू मिया ब्लिचफेल्ड्ट हिने इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील सरावासाठी असलेल्या विभागाला अस्वच्छ, सुमार दर्जा अन् व्यावसायिकपणाचा अभाव असे स्पष्टपणे उद्देशून कडाडून टीका केली आहे. आगामी महिन्यांत नवी दिल्लीमध्येच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा येथे पार पडणार आहे. त्याआधी या क्रीडा संकुलाकडे लक्ष द्या, असे आवाहन तिच्याकडून जागतिक बॅडमिंटन संघटनेकडे करण्यात आले आहे.