भारतीयांसमोर खडतर आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Badminton

भारतीयांसमोर खडतर आव्हान

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर २२ ऑगस्टपासून टोकियोमध्ये सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये खडतर आव्हान असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी जाहीर करण्यात आला. यावेळी भारतीय खेळाडूंना कठीण ड्रॉचा सामना करावा लागणार आहे.

सिंधू हिने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला होता. यंदा तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. सिंधूला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हॅन यूए व वँग झी ई या दोन खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या ॲन सी यंग या बॅडमिंटनपटूंशी तिला दोन हात करावे लागणार आहेत.

साईना नेहवालला हाँगकाँगच्या च्युअँग यी हिचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास साईनाला पुढील फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहराचे आव्हान असणार आहे. मालविका बनसोडला डेन्मार्कच्या ख्रिस्तोफरसन हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

श्रीकांत, लक्ष्य, प्रणॉय एकाच हाफमध्ये

महिलांप्रमाणे पुरुषांच्या एकेरीतही भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन व एच. एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू एकाच हाफमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा एकच खेळाडू उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत आगेकूच करू शकणार आहे. याशिवाय बी. साईप्रणीत हा भारताचा चौथा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला आहे.

दुहेरीतही तीच परिस्थिती

भारतीय खेळाडूंसाठी दुहेरी विभागातही तीच परिस्थिती असणार आहे. सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला मलेशिया व जपान या देशांमधील स्टार खेळाडूंना त्यांना सामोरे जावे लागेल. गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली या भारतीय जोडीसमोर सुवर्णपदक जिंकलेल्या पिअर्ली टॅन- तिन्नाह मुरलीधरन यांचे आव्हान असेल.

Web Title: Badminton World Championships Indian Challenge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..