Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

पुणे हाफ मॅरेथॉन झाल्यानंतरही सराव सुरू ठेवण्याचा निर्धार
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 sakal senior citizen vinaya malusare
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 sakal senior citizen vinaya malusareSakal

पुणे : बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमुळे पुण्यातील अनेक धावपटूंना तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्याची प्रेरणा मिळते. यंदा ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. कोथरूडच्या लोकमान्य नगर परिसरातील जीत ग्राउंडवर राष्ट्रीय धावपटू विनया मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांचा एक गट सराव करतो हे.

विनया यांनी क्रॉस कंट्रीसह लांब पल्ल्याच्या शर्यतींमध्ये यश मिळविले आहे. त्यांनी सांगितले की, यंदा ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनी पाच किमी शर्यतीसाठी नावनोंदणी केली आहे. यातील प्रमोद जोशी यांचे वय ७४ इतके आहे.

ही मंडळी रोज सरावासाठी येतात. ते आखून दिलेला व्यायाम आवडीने करतात. विशेष म्हणजे शर्यत झाल्यानंतरही सराव थांबवायचा नाही असे त्यांनी आतापासूनच ठरविले आहे. रोज सराव करताना कुठेही दुखते किंवा त्रास होतो असे कुणीही कधीही म्हणत नाही.

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 sakal senior citizen vinaya malusare
Saptashrungi Hill Marathon: सप्तशृंगी हिल मॅरेथॉनमध्ये निकम, कसबे प्रथम; विविध स्पर्धंकाच्या हजेरीने रंगत

ही शर्यत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी आदर्श मानली जाते. त्यामुळे वर्षागणिक जास्त अंतराच्या गटात भाग घेणे किंवा पसंतीच्या गटातील वेळेत सुधारणा करण्यासाठी धावपटू झोकून देत सराव करतात. त्यासाठी फिटपेजच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते.

मी स्वतः २०१९ मध्ये एलिट गटात हाफ मॅरेथॉन धावले होते. तेव्हा मला चौथा क्रमांक मिळाला होता. माझी ही आवडती शर्यत आहे. स्पर्धेचा मार्ग उत्तम आहे. तांत्रिक पदाधिकारी चांगले काम बघतात. दर्जेदार धावपटूंविरुद्ध तुमचा कस लागतो.

- विनया मालुसरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com