Pune Grand Tour 2026: भारताच्या पहिल्या UCI 2.2 रोड सायकलिंग शर्यतीत 28 आंतरराष्ट्रीय संघांचा सहभाग; पुणे जागतिक सायकलिंग नकाशावर
India’s First UCI 2.2 Road Cycling Race: बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 दर्जाची आंतरराष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धा आहे. जगभरातील संघांच्या सहभागामुळे भारत जागतिक सायकलिंग नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे.
पुणे : भारतात पहिल्यांदाच UCI 2.2 दर्जाची बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही कॉन्टिनेंटल टीम्स मेन्स एलिट रोड सायकलिंग शर्यत आयोजित होत असून, भारतीय क्रीडा क्षेत्रात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.