बांगलादेश दक्षिण आफ्रिकेतील 'टुकार' अंपायरिंगची करणार तक्रार | Bangladesh Cricket Board Will Complaint Against South Africa Umpires | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Cricket Board Will Complaint Against South Africa Umpires

बांगलादेश दक्षिण आफ्रिकेतील 'टुकार' अंपायरिंगची करणार तक्रार

बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (Bangladesh vs South Africa) अनुभवलेल्या टुकार अंपायरिंगची अधिकृत तक्रार आयसीसीकडे करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवलेल्या पक्षपाती अंपायरिंग (Bias Umpiring) आणि असह्य अशा स्लेजिंगची तक्रार करणार आहे. याबाबतची माहिती बीसीबीच्या (BCB) अधिकाऱ्याने दिली. डर्बन कसोटीत (Durban Test) अंपायरचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. बांगलादेशचा दुसरा डाव 53 धावात संपुष्टात आला होता. खेळाडूंना अपमानजनक टिप्पणींचा देखील सामना करावा लागला होता.

हेही वाचा: VIDEO : मुंबई-पुणे वाहतूक कोंडी; सचिन झाला डोलकर दर्याचा राजा…!

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जलाल युनूस यांनी एएफपीला सांगितले की, 'तुम्ही सर्वांनी माहिती आहेच की त्या सामन्यात पक्षपाती निर्णय देण्यात आले. याचबरोबर मैदानावर असह्य असे स्लेजिंग देखील अनुभवायला मिळाले. आम्ही याबाबत आयसीसीकडे लिखित तक्रार करणार आहोत.'

जलाल पुढे म्हणाले की, 'आम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत पहिल्यांदाच वनडे मालिका 2-1 अशी जिंकली त्यावेळी खराब अंपायरिंगचा अनुभव आला. सामनाधिकारी अँडी पॅक्रॉफ्टबाबत ही तक्रार येत होती.' जलाल म्हणाले की, 'आमचे व्यवस्थापक त्यांच्याशी अनेकवेळा बोलले. त्यांनी आमच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. आम्ही आता आयसीसीकडे कसोटी मालिकेसाठी तटस्थ अंपायर देण्याची लवकरात लवकर सोय करावी अशी मागणी केली आहे. आम्ही देखील आमच्या देशात तटस्थ अंपायरचे स्वागत करण्यास तयार आहोत.'

हेही वाचा: 'जवळकर' अय्यरचे अभिनेत्री प्रियांकासोबतचे चॅट व्हायरल

आयसीसीने 2020 मध्ये कोरोनची महामारी पाहता आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेली बंदी पाहता स्थानिक अंपायर ठेवण्यास परवानगी दिली होती. बांगलादेशविरूद्धच्या डर्बन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे एरासमुस आणि अॅड्रियन होल्डस्टॉक हे दोघे अंपायर होते. बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक्कने सांगितले की, ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू स्लेजिंग करत होते त्यावेळी अंपायर्सनी हस्तक्षेप केला नाही.

Web Title: Bangladesh Cricket Board Will Complaint Against South Africa Umpires To Icc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top