4, 4, 6, 1... जखमी वाघ रोहित शेवटपर्यंत लढला मात्र भारत हरला : Rohit Sharma BAN vs IND 2nd ODI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Vs India 2nd ODI

BAN vs IND 2nd ODI : 4, 4, 6, 1... जखमी वाघ रोहित शेवटपर्यंत लढला मात्र भारत हरला

Bangladesh Vs India 2nd ODI : भारताची अवस्था 42.2 षटकात 8 बाद 207 धावा अशी झाली असताना दुखऱ्या अंगठ्यानिशी कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडलेल्या भारतासाठी मैदानात उतरला. त्याने 28 चेंडूत 51 धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना त्याला फक्त 1 धाव काढता आली. बांगलादेशने सामना 5 धावांनी जिंकत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली.

तत्पूर्वी, बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 271 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने नाबाद शतकी तर मोहम्मदुल्लाने 77 धावांची झुंजार खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरूवातीला बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत त्यांची अवस्था 6 बाद 69 धावा अशी केली होती. मात्र मेहदी हसन मिराझने मोहम्मदुल्लाच्या (77) साथीने सातव्या विकेटसाठी 147 धावांची दमदार भागीदारी रचली.

रोहितने बदलला गिअर

रोहित शर्माने धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर वाढू लागल्यानतंर 46 व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत 18 धावा वसूल केल्या. त्याने सामना 24 चेंडूत 41 धावा असा आणला.

213-8 : दीपक चाहरने सोडली साथ

रोहित शर्मा मैदानात आल्यानंतर भारताला दिलासा मिळाला होता. मात्र दीपक चाहर 11 धावा करून बाद झाला अन् रोहित एखटा पडला.

207-7 : शार्दुल ठाकूर बाद, अखरे रोहित शर्मा आला मैदानात 

शार्दुल 7 धावांची भर घालून माघारी गेला. शार्दुल परतल्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापत झाली असताना अडचणीत सापडलेल्या संघासाठी धावून आला.

189-6  : सेट झालेला अक्षर पटेल देखील बाद 

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर सेट झालेल्या अक्षर पटेलवर सर्व मदार होती. मात्र तो देखील 56 चेंडूत 56 धावा करत बाद झाला.

172-5 (35 Ov) : अय्यर - पटेलची शतकी भागीदारी मेहदीने फोडली

श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी 101 चेंडूत 107 धावांची शतकी भागीदारी रचली. बांगलादेशविरूद्ध पाचव्या विकेटसाठी भारताकडून केली गेलेली ही सर्वात मोठी भागीदारी होती. मात्र मेहदी हसन मिराझने श्रेयस अय्यरला 82 धावांवर बाद करत फोडली.

श्रेयस अय्यरचे झुंजार अर्धशतक 

भारतीय संघाची वरची फळी माघारी गेल्यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पेटलच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने झुंजार अर्धशतक ठोकत अक्षर पटेलसोबत भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 27 षटकात 124 धावांपर्यंत पोहचवले.

65-4 : केएल राहुल देखील माघारी, भारत अडचणीत

बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही भारताला धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने भारताचा काळजीवाहू कर्णधार केएल राहुलला 14 धावांवर बाद करत भारताला शंभरच्या आत चौथा धक्का दिला.

39-3 : शाकिबने दिला तिसरा धक्का

भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर श्रेयस अय्यर आणि बढती मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी शाकिब अल हसनने 10 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरला 11 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

 13-2 : शिखर धवनही परतला 

बांगलादेशने विराट कोहलीची मोठी विकेट घेतल्यानंतर भारताचा दुसरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला देखील 8 धावांवर माघारी धाडले. त्याला मुस्तफिजूरने शॉर्ट बॉलवर बाद केले.

7-1 : दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का

रोहित शर्माच्या जागेवर सलामीला आलेल्या विराट कोहलीने चौकार मारत भारताच्या डावाची सुरूवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात इबादत हुसैनने त्याचा 5 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला.

रोहितच्या अनुपस्थितीत विराट आला सलामीला

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने मैदान सोडले. आता दुसऱ्या डावात त्याच्या ऐवजी शिखर धवनच्या साथीला विराट कोहली सलामीला आला आहे.

BAN 271/7 (50) मेहदी हसनचे दमदार शतक 

बांगलादेशची अवस्था 6 बाद 69 अशी झाली असताना मेहदी हसन मिराझने झुंजार शतकी खेळी करत बांगलादेशला 50 षटकात 7 बाद 271 धावांपर्यंत पोहचवले. त्याने सातव्या विकेटसाठी मोहम्मदुल्लासोबत 147 धावांची भागीदारी रचली. त्याने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण केले.

217-7 : उमरानने 147 धावांची पार्टनरशिप तोडली

बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ आणि मोहम्मदुल्लाने सातव्या विकेटसाठी 147 धावाची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी उमारन मलिकने मोहम्मदुल्लाला 77 धावांवर बाद करत फोडली. मेहदी आणि मोहम्मदुल्लाने बांगलादेशला 6 बाद 69 धावांवरून 217 धावांपर्यंत पोहचवले.

मेहदी हसनचे अर्धशतक

38 षटकांनंतर बांगलादेशने 6 गडी गमावून 165 धावा केल्या आहेत. सध्या महमुदुल्लाह 61 चेंडूत 45 आणि मेहदी हसन मिराज 56 चेंडूत 51 धावांवर खेळत आहे. मेहदी हसनने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी करत वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले आहे.

मेहदीने पुन्हा केला चमत्कार! टीम इंडियाचे टेन्शन वाढले

36 षटकांनंतर बांगलादेशने सहा गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्याचा हिरो असलेला मेहदी हसन मिराज आणि महमुदुल्लाह यांनी 80+ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध सातव्या विकेटसाठी बांगलादेशची ही सर्वोच्च भागीदारी आहे. मेहदी आपले तिसरे वनडे अर्धशतक जवळ आले आहे. तो 49 आणि महमुदुल्लाह 37 धावांवर खेळत आहे.

भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशमध्ये कहर! 6 बाद 126

बांगलादेशच्या धावसंख्येने सहा विकेट गमावून 125 धावा केल्या आहेत. मेहंदी हसन आणि महमुदुल्लाह शानदार फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि बांगलादेशला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशची धावसंख्या 31 षटकांत 6 बाद 126 अशी आहे.

बांगलादेशची धावसंख्या 80 धावा पार

बांगलादेशच्या धावसंख्येने सहा गडी गमावून 80 धावा केल्या आहेत. मेहदी हसन आणि महमुदुल्ला क्रीजवर आहेत. भारतीय गोलंदाज उत्कृष्ट लयीत आहेत. वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन आणि उमरान मलिकला एक विकेट मिळाली. बांगलादेशची धावसंख्या 22 षटकांत 6 बाद 86 अशी आहे.

52-3  : स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर उमरानने उडवला त्रिफळा

कुलदीप सेनच्या जागेवर संघात स्थान मिळालेल्या उमरान मलिकने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर नजमुल हुसैन शंतोचा त्रिफळा उडवला.

39-2 : मोहम्मद सिराजने दिला बांगलादेशला दुसरा धक्का

मोहम्मद सिराजने बांगलादेशाला 10 व्या षटकात दुसरा धक्का दिला. त्याने 23 चेंडूत 7 धावांची खेळी करणाऱ्या लिटन दासचा त्रिफळा उडवून दिला. लिटन दास बाद झाला त्यावेळी बांगलादेशच्या 9.2 षटकात 2 बाद 39 धावा झाल्या होत्या.

बांगलादेशच्या 6 षटकात 1 बाद 28 धावा 

11-1 : मोहम्मद सिराजने बांगलादेशला दिला पहिला धक्का

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात चौथ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने अनुमल हकचा झेल सोडला. मात्र पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला झेल घेताना दुखापत देखील झाली. त्याच्या बोटातून रक्त येत असल्याने तो मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये परतला.

रोहित शर्माने संघात केले दोन बदल

कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले असून शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. तर कुलदीप सेन निवडीसाठी उपलब्ध नसल्याने स्पीड गन उमरान मलिकला संधी मिळाली आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकली

दुसऱ्या आणि महत्वपूर्ण वनडे सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने मालिका जिवंत ठेवण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात नाणेफेक गमावली.