VIDEO: पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या पोरी बेभान होऊन नाचल्या I ICC Women's World Cup Bangladesh Women's Cricket Team Beat Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Womens Cricket Team Beat Pakistan

VIDEO: पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या पोरी बेभान होऊन नाचल्या

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्डकप 2022 मध्ये (ICC Women's World Cup 2022) बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने (Bangladesh Women's Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानचा (Pakistan Women's Cricket Team) 9 धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आपली पहिला वहिला विजय साजरा केला. या पहिल्याच विजयाचा आनंद बांगला खेळाडूंनी डान्स करून साजरा केला. दुसरीकडे पाकिस्तानला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अजून आपले खाते देखील उघडता आलेले नाही. पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तळात आहे.

हेही वाचा: Video: पोलिसांची 'फिटनेस' टेस्ट घेणाऱ्या विराट चाहत्याची अखेर मानगुट धरलीच

पाकिस्तानचा यंदाच्या वर्ल्डकपमधील हा चौथा सामना होता. बांगलादेशबरोबरचा हा सामना जिंकून पाकिस्तान विजयी खाते उघडले असे वाटले होते. मात्र बांगलादेशन पाकिस्तानला चांगलाच धक्का दिला. (Bangladesh Beat Pakistan) बांगलादेश या विजयाने गुणतालिकेत आता इंग्लंडच्या वर पोहोचली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 7 बाद 234 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानने देखील या 235 धावांच्या आव्हानाला 2 बाद 183 धावा करत चांगले प्रत्युत्तर दिले होते. मात्र त्यानंतर फक्त 5 धावात पाकिस्तानने पाच फलंदाज गमावले. अखेर पाकिस्तानचा डाव 225 धावात गुंडाळली गेली.

हेही वाचा: IPL 2022 : 'मॅकेनिक दिसतोस', गुजरात टायटन्सची जर्सीवर कमेंटचा पाऊस

बांगलादेशकडून फातिमा खाजूनने 8 षटकात 3 विकेट मिळवत भेदक मारा केला. तर रूहाना अहमदने देखील 2 विकेट घेत बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाला (Bangladesh Historical Win) हातभार लावला. या विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Web Title: Bangladesh Womens Cricket Team Beat Pakistan Celebrate First Icc Womens World Cup Victory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top