Barcelona : बार्सिलोनाने चार सामने शिल्लक असतानाच ला लीगा स्पर्धा जिंकली; चार वर्षांनंतर पुन्हा विजेते

अखेरचे चार साखळी सामने शिल्लक असण्यापूर्वीच बार्सिलोनाने यंदाच्या ला लीगा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
barcelona win la liga champions 2023
barcelona win la liga champions 2023sakal
Summary

अखेरचे चार साखळी सामने शिल्लक असण्यापूर्वीच बार्सिलोनाने यंदाच्या ला लीगा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

बार्सिलोना - अखेरचे चार साखळी सामने शिल्लक असण्यापूर्वीच बार्सिलोनाने यंदाच्या ला लीगा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. २०१८-१९ नंतर पुन्हा एकदा त्यांनी हा बहुमान मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात एस्पान्योल संघाचा ४-२ असा पराभव केला.

या सामन्यात बार्सिलोनाने मध्यांतराला ३-० अशी विजयी आघाडी घेत विजेतेपदाच्या दिशेने झेप घेतली होती. अनुभवी रॉब्रेट लेवांडोवस्कीने लीगमधला आपला २० वा गोल केला. त्यानंतर अलजेंद्रो ब्लेदे याने दोन गोल केले. उत्तार्धात लेवांडोवस्कीने आणखी एक गोल केला, तर बार्सिलोनाचा चौथा गोल जुलेस कौंदेने झळकावला.

एस्पान्योल संघाकडून जावियर पौदो आणि ज्योसेलू यांनी गोल केले, परंतु त्यामुळे बार्सिलोनाचे विजयाचे अंतर कमी झाले. त्यांचा संघ २० पैकी १९ व्या स्थानावर कायम राहिला.

बार्सिलोनाने ३४ सामन्यांतून ८५ गुणांची कमाई केली. पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिदपेक्षा त्यांनी १४ गुणांची मोठी आघाडी घेतली. रेयाल माद्रिदने त्यांचे पुढचे चारही सामने जिंकले तरी १२ गुण मिळवू शकतात. त्यामुळे बार्सिलोनाचे विजेतेपद या सामन्यातूनच निश्चित झाले.

सुपरस्टार लिओनेल मेस्सीने २०२१ मध्ये गुडबाय केल्यानंतर बार्सिलोनाने ला लीगाचे मिळवलेले हे पहिले विजेतेपद आहे. याच वर्षी माजी खेळाडू झावी यांची प्रशिक्षकपदी नियुत्ती करण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोना पुन्हा विजेते ठरले आहे.

अखेरच्या साखळी सामन्यानंतर विजेतेपदाचा करंडक बहाल करण्यात येणार असला तरी बार्सिलोनाने एस्पान्योलविरुद्धचा सामना संपताच जल्लोष सुरू केला; परंतु त्यांच्या या जल्लोषाने गालबोट लावले. एस्पोन्योलच्या काही पाठीराख्यांना मैदानावर खाली पाडले.

एकीकडे ला लीगाचे विजेतेपद मिळवले असले तरी बार्सिलोनाला प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगमधून सुमार कामगिरीमुळे गटातूनच बाहेर जावे लागले. गटातील सहापैकी तीन सामने त्यांनी गमावले. झावी यांच्यासाठी हे आठवे ला लीगा विजेतेपद आहे. १७ वर्षे या क्लबमधून खेळाडू म्हणून खेळताना त्यांनी सात वेळा हा करंडक उंचावला होता. यंदा ते पूर्ण काळ बार्सिलोनाचे प्रशिक्षक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com