IRE vs IND
IRE vs IND esakal

IRE vs IND : बुमराह, कृष्णाचे धक्के मात्र बॅरीने आयर्लंडला सावरले; भारतासमोर उभारली आव्हानात्मक धावसंख्या

Published on

IRE vs IND : भारत आणि आयर्लंड यांच्याविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडची अवस्था 6 बाद 59 धावा अशी केली असताना बॅरी मॅकार्थेने 33 चेंडूत 51 धावांची खेळी करत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंगने 1 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.

IRE vs IND
IRE vs IND 1st T20 : पाऊसही वाचवू शकला नाही आयर्लंडचा पराभव, भारताचा अवघ्या 2 धावांनी विजय

जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बुमराहने पहिल्याच षटकात आयर्लंडच्या 2 विकेट्स घेत मोठा धमाका केला. पहिल्याच षटकात 2 बाद 4 धावा अशी अवस्था झाल्यानंतर हॅरी टेक्टर आणि स्टर्लिंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने या दोघांनाही बाद करत आयर्लंडची पॉवर प्लेमध्ये अवस्था 4 बाद 27 अशी अवस्था केली. प्रसिद्ध कृष्णाने डॉक्रेलला 1 धावेवर बाद करत आयर्लंडला पाचवा धक्का दिला.

IRE vs IND
World Shooting Championship : शिवा अन् इशानं भारताला जिंकून दिलं सुवर्ण; पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप

भारतीय संघाचा धडाका पाहून आयर्लंडचा संघ शंभरी तरी पार करतो की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र बॅरी मॅकार्थेने 33 चेंडूत 51 धावांची खेळी करत आयर्लंडला शतकी मजल मारून दिली. त्याने सातव्या विकेटसाठी कॅम्परसोबत 57 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. कॅम्परने 39 धावांचे योगदान दिले. या भागीदारीच्या जोरावर आयर्लंडने 20 षटकात 7 बाद 139 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com