
चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; प्रसिद्ध कृष्णाला लागली लॉटरी
मुंबई : बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. या संघात काऊंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पुनरागमन केले आहे. याचबरोबर उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन वेगावान गोलंदाजांना देखील संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून केएल राहुलची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा: केएल राहुलच्या गळ्यात भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदाची माळ
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र नुकताच फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीचे देखील संघात स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर संघात शुभमन गिल, हनुमा विहारी आणि केएस भरत यांचा देखील समावेश आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची देखील कसोटी संघात वर्णी लागली.
हेही वाचा: दीपक चहर लवकरच चढणार घोड्यावर; लग्नाची पत्रिका व्हायरल
भारतीय कसोटी संघ पुढील प्रमाणे :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विराही, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
भारतीय टी 20 संघ पुढील प्रमाणे :
या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.
Web Title: Bcci Announce Test Squad For England Tour Cheteshwar Pujara Come Back In Test Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..