BCCI Central Contract: भारतीय महिला क्रिकेट संघ मालामाल! BCCI ने खेळाडूंवर पाडला पैशाचा पाऊस

पहा BCCI कोणाला किती दिलं मानधन
BCCI announces annual player retainership 2022-23 Team India Women
BCCI announces annual player retainership 2022-23 Team India Women
Updated on

BCCI Central Contract: बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ महिला संघाचा वार्षिक करार जाहीर केला आहे. सर्वात मोठा करार ए ग्रेड आहे. ज्यामध्ये बोर्डाने कर्णधार हरमनप्रीत कौरसह 3 खेळाडूंना कायम ठेवले आहे. यावेळी मंडळाच्या सर्वात मोठ्या करारात 5 ऐवजी केवळ 3 खेळाडू आहेत. गोलंदाज पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड या वर्षातील सर्वात मोठ्या करारातून बाहेर पडल्या आहेत.

BCCI announces annual player retainership 2022-23 Team India Women
IPL 2023 : 4 चौकार ... 5 षटकार... तुफानी खेळीनंतर जेसन रॉयला BCCIने ठोकला दंड; बालिश कृत्यासाठी झाली शिक्षा

बीसीसीआयच्या ए ग्रेडमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह उपकर्णधार स्मृती मानधना आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना कायम ठेवण्यात आले आहे. A श्रेणीतील महिला क्रिकेटपटूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळतात. गायकवाड आणि पूनम यांची पदावनत करण्यात आली आहे. गायकवाड A वरून B मध्ये घसरले आहे. तर पूनम स्वतः कराराबाहेर आहे.(BCCI announces annual player retainership 2022-23 Team India Women )

BCCI announces annual player retainership 2022-23 Team India Women
IPL 2023 : हैदराबादला 8.75 कोटींचा धक्का! स्फोटक अष्टपैलू खेळाडू IPL मधून बाहेर

B श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळतील. रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यासह 5 खेळाडूंचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या वर्गात फक्त शेफाली कायम आहे. तर जेमिमा आणि रिचा यांना बढती मिळाली आहे. जी आधीच्या करारात सी ग्रेडमध्ये होती.

C श्रेणीतील 9 खेळाडू

बीसीसीआयच्या C श्रेणीमध्ये मेघना सिंग, देविका वैद्य, सब्बिनेनी मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया यांच्यासह 9 खेळाडूंचा समावेश आहे. पूजाही B वरून C वर घसरली आहे. पूनम राऊत थेट सी मधून बाहेर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com