Hardik Pandya : BCCIची रोहित शर्मावर मोठी कारवाई; कर्णधारपद हिसकावून 'या' दिग्गजाकडे सोपवलं

कर्णधारपदात मोठा बदल! रोहित शर्माच्या जागी हा खेळाडू होणार कर्णधार....
Hardik Pandya to take over team India T20 Captaincy
Hardik Pandya to take over team India T20 Captaincysakal

Team India T20 Captaincy : सध्या भारतीय संघ बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाला याआधी बांगलादेशविरुद्ध टी-20 विश्वचषक आणि वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. वृत्तानुसार सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही, परंतु बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी हार्दिक पांड्याशी संपर्क साधला आहे. (Hardik Pandya to take over team India T20 Captaincy)

मात्र, हार्दिक पांड्याने आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी बीसीसीआयकडे वेळ मागितला आहे. दरम्यान बीसीसीआय नवीन निवड समिती नियुक्त करून निर्णयाची औपचारिकता करेल. रोहित शर्मा कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

Hardik Pandya to take over team India T20 Captaincy
BCCI Apex Council Meeting : बैठक संपली! द्विशतक ठोकूनही रहाणेला डच्चू; स्कायला मात्र बढती?

नवीन निवड समिती आल्यानंतर हार्दिक टी-20 कर्णधार बनण्याची खात्री आहे. हार्दिकला एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही सामन्यांचा कर्णधार बनवण्याचा एकमेव कारण म्हणजे त्याची तंदुरुस्ती आहे. याबाबत पांड्याशीही बोलणे झाले आहे. आता तो सलग दोन फॉरमॅट खेळू शकतो की नाही हे सांगेल.

Hardik Pandya to take over team India T20 Captaincy
IPL 2023 Auction : कोण मोडू शकतो ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड, स्टोक्स की सॅम?

तीन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळ्या संघांबद्दल, तीन वेगवेगळ्या कर्णधारांसह, किंवा एक पांढरा-बॉल आणि एक लाल-बॉलचा कर्णधार याबद्दल यापूर्वीही चर्चा झाली आहे. हार्दिकने या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत बाहेर पडली होती आणि तेव्हापासून भारतीय संघात मोठे बदल होतील अशी अटकळ बांधली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com