World Cup 2019 : पोरांनो खेळ दाखवायची घाई करा; भारतीय संघाची घोषणा होणार 'या' दिवशी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

- विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार 20 एप्रिल किंवा त्याआधीच.

- संघात चौथ्या फलंदाजाच्या जागेसाठी चुसर सुरु. तसेच, चौथा वेगवान गोलंदाज आणि धोनीला बॅकअप म्हणून यष्टीरक्षकाचाही शोध सुरु 

वर्ल्डकप 2019 : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलमधून भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडविण्याचा निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असणार आहे. अशातच विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा 20 एप्रिल किंवा त्याधी होणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

''विश्वकरंडकात भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी खात्री आहे. विश्वकरंडकासाठी भारतीय संघ 20 एप्रिल किंवा त्याआधीच घोषित करण्यात येईल. या संघात तगडे खेळाडू असतील जे भारताला विश्वकरंडक जिंकून देतील. आम्ही गेले दीड वर्ष त्यावर काम करत आहोत आणि त्यानुसारच संघात खेळाडूंची निवड केली जाईल, '' असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले. 

भारतीय संघात सध्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर संघात चौथा वेगवान गोलंदाज आणि बदली यष्टीरक्षकासाठी खेळाडूचा शोध सुरु आहे. त्यामुळे खेळाडूंना आयपीएलच्या सुरवातीच्या सत्रातच चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI to declare squad for World Cup on or before 20th April