BCCI : माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Dilip Vengsarkar

BCCI : माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये

मुंबई : भारताचे माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे प्रतिनिधी म्हणून स्थान असणार आहे. महिलामध्ये शुभांगी कुलकर्णी यांनी हा मान मिळवला आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत वेंगसरकर यांनी माजी कसोटीपटू अशोक मल्होत्रा यांचा ४०२ विरुद्ध २३० असा पराभव केला.

हेही वाचा: BCCI Gender Equality : चंदू बोर्डेनीं केलं जय शहांचे अभिनंदन; मोठं दिवाळी गिफ्ट मिळालं

भारतीय क्रिकेटपटू संघटनेची आज ऑनलाईन निवडणूक झाली. यातून बीसीसीआयच्या अपेक्स कॉन्सिलमध्ये कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता होती. क्रिकेट प्रशासनात मुंबई क्रिकेटचे उपाध्यक्ष राहिलेले वेंगसरकर राष्ट्रीय निवड समितीचेही अध्यक्ष राहिलेले आहेत. आयपीएलच्या प्रशासकीय समितीमध्ये माजी फिरकी गोलंदाज पग्यान ओझा यांनी स्थान मिळवले. या पदासाठी त्यांनी विजय मोहन राज यांचा ३९६ विरुद्ध २३४ असा पराभव केला.

हेही वाचा: BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

खिरिड यांचा एका मताने विजय

अपेक्स बॉडीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून पुरुष प्रतिनिधीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत रणजित खिरिड यांनी अतुल गायकवाड यांच्यावर ३६-३५ अशी एका मताने मात केली.